बुधवार, २ सप्टेंबर, २०१५

आपण प्रश्न विचारायचे नाहीत
आपण फक्त 'गप्प' बसायचं

का? केव्हा? कसं? कधी?
असं काही विचारलं तर
येईल तो बागुलबुवा आणि
आपल्याला घेऊन अंधारात
गडप होऊन जाईल...

तरी पडलेच आपल्याला प्रश्न
तर त्यांना ठेवायचं कोंडून
मनाच्या तळघरात...
त्यांना द्यायची शिक्षा काळ्या पाण्याची
कोठडीचे गज इतके मजबूत
ठेवायचे की कधीच त्यांनी
बाहेर पडता कामा नये...

आपण चालत राहायचं
बोट दाखवेल त्या दिशेने
प्रश्न न विचारता आपण
फक्त चालत राहायचं...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा